वडगाव मावळ : धामणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विक्रम सदाशिव गराडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी अनिकेत बाबूलाल गराडे यांची निवड झाली. वडगाव मावळ येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात झालेल्या निवडणूक प्रक्रियेत चेअरमनपदी विक्रम गराडे व व्हाईस चेअरमनपदी अनिकेत गराडे यांची निवड झाली. सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत १२ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर उर्वरित १० पैकी ८ जागांवर पद्मावती देवी सहकारी पॅनेलने विजय मिळवला. यावेळी सोसायटीचे संचालक गणेश गराडे, पंडित गराडे, काळूराम गराडे, पांडुरंग गराडे, सिंधुबाई गराडे, छाया गराडे, संतोष गराडे, रवींद्र गराडे उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून तळपे यांनी तर सहाय्यक म्हणून सचिव गुलाब ढोरे यांनी काम पाहिले. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष हनुमंत गराडे, दत्तात्रय गराडे, बाबूलाल गराडे, श्यामराव गराडे, रामदास गराडे, एच.एल. गायकवाड, आनंदराव गराडे, गराडे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला.

error: Content is protected !!