मावळमित्र न्यूज विशेष:
सेवाभाव हाच मूळपिंड असलेल्या तरूणाने ‘सेवा फाउंडेशनच्या स्थापनेत पुढाकार घेतला. आणि सेवा फाउंडेशनला समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. इतकेच काय सेवा फाउंडेशनच्या पुढाकाराने ग्रामीण भागातील अनेक समस्या सोडविण्यात फाउंडेशनला यश आले.
सेवा फाउंडेशनच्या या कार्याची दखल घेत,अनेक सामाजिक संस्थाच्या सेवा फाउंडेशनला गौरविण्यात आले. हा गौरव कोणा एकट्या दुकट्याचा नसून सेवा फाउंडेशन मध्ये काम करणा-या प्रत्येकाचा आहे. वैयक्तिक मान सन्मान मिळताना जेवढा आनंद होतो,त्या पेक्षा कित्येक पट फाउंडेशनच्या सन्मानाची किंमत कित्येक पट वाढत जात असल्याचे या तरूण मित्राचे मत आहे.
लोक सेवेचे व्रत हाती घेतलेल्या या तरूणाने हातात कधी लेखणी घेतली,हे त्याला समजलेच नाही. पण हातात आलेल्या लेखणीने नुसता कागद निळा करायचा नाही. किंवा काँप्युटरच्या की बोर्ड वर टकटक करायचे असे नाही. त्या लेखणीतून समाजाच्या हिताच्या काही ना काही तरी चांगले वाईट लिहायचे असते. हे साधे गणित उमगलेले हा तरूण पत्रकारितेत आपले नशीब अजमावून पाहत आहे. सेवा भावी वृत्तीने काम करणारा,सेवा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचा माजी अध्यक्ष आणि पत्रकारितेत नाव मिळवू इच्छिणाऱ्या तरूणाचे नाव चंद्रकांत असवले आहे.
चंद्रकांत असवले टाकवे बुद्रुक येथील शेतकरी कुटुंबांतील तरूण. सुख दु:खाचे अनेक ऊन पावसाळे पाहिलेल्या या तरूणाने सुखा सोबत दु:खाचे अनेक चटके अनुभवले आहे.
कुटूबियांच्या भरभक्कम पाठिंब्यावर एक एक समस्या सोडवित हा तरूण पुढे जावू लागला आहे. समाजात काय कितीही चांगले काम करा,त्यात उणीवा शोधणा-यांची काही कमतरता नाही. असे अनेक जण आपल्या मागे पुढे फिरत असतात. समाजात उणीवा शोधून त्यावर बोट ठेवून मागे खेचणारे असतात. तसे त्याच बोटाला हातात धरून सतमार्गाने पुढे घेऊ जाणारे पावलो पावली भेटत असतात. अशा अनेक ऊन पावसाळ्याच्या अनुभवातून नवनिर्मिती साठी धडपडणारा चंद्रकांत असवले.
पंचक्रोशीत नावाजलेला तरूण आहे,अनेकांच्या सुख दु:खात सहभागी होऊन त्यांना आधार देणारा,कोरोना सारख्या महामारीत रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी योगाचा ध्यास धरीत अनेकांना योगाभ्यासासाठी आग्रह धरणारा चंद्रकांत कित्येकांनी पाहिला आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळवून देण्यासाठी धडपडणारा चंद्रकांत असवले विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे. सेवाभावी वृत्तीचा हा तरूण अधिक सामाजिक कार्यात सहभागी होऊन,त्यांच्या हाताने अधिक विधायक उपक्रम होवो याच आजच्या दिवशी चंद्रकांत असवले या तरूण मित्रास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..

error: Content is protected !!