वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी नागाथली येथील राज धोंडिबा खांडभोर यांची निवड करण्यात आली. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी त्यांची निवड केली. आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते खांडभोर यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादीचे माजी कार्याध्यक्ष दिपक हुलावळे,किरण हुलावळे,अमोल केदारी बाळासाहेब आडकर,दिनकर शंकर आडकर, बाळा श्रीपती आडकर,फिरोज शेख,शाम विकारी ,संतोष ढाकोळ,अक्षय केदारी,
रोशन केदारी विशाल केदारी, सौरभ केदारी, मंगेश केदारी ससंतोष येवले, विशाल येवले,रोहीत विकारी
,राकेश केदारी,संकेत केदारी,उमेश येवले,आदेश केदारी, अमित सपकाळ, विकी हेंद्रे , विलास कांबळे, नितीन गोणते,सुहास शिंदे अजय गायकवाड उपस्थित होते.
खांडभोर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते असून मावळ तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस पदापासून हे संघटनेत सक्रीय आहे .
यापूर्वी त्यांनी मावळ तालुका राष्ट्रवादी युवकच्या सरचिटणीस पदावर काम केले आहे. तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेले खांडभोर शैक्षणिक,धार्मिक व सामाजिक संस्थेशी निगडित आहे.
राज खांडभोर म्हणाले,” राष्ट्रवादीच्या धर्मनिरपेक्ष विचारांना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पेलणार.

error: Content is protected !!