वडगाव मावळ:
भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत नाणे मावळ व पवन मावळातील कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हातात घडयाळ बांधले. मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद दिवसागणिक वाढत असून भाजपला खिंडार पाडण्यात राष्ट्रवादी यशस्वी होत आहे.
मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या पुढाकाराने आजचा पक्ष प्रवेश प्रदेश कार्यालयात पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार,मावळचे आमदार सुनिल शेळके,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेश झाला. मावळ तालुका राष्ट्रवादीचे माजी कार्याध्यक्ष दिपक हुलावळे उपस्थित होते.
भाजपा सहकार आघाडी मावळ अध्यक्ष अमोल सुरेश केदारी, माजी सरपंच शिवली बाळासाहेब आडकर, माजी पंचायत समिती सदस्य दिनकर आडकर, सामाजिक कार्यकर्ते अरुण आडकर, मावळ तालुका काँग्रेस पक्ष प्रवक्ता फिरोज शेख, शाम विकारी, संतोष ढाकोळ, रोशन केदारी, मंगेश केदारी, संतोष येवले, विशाल येवले, रोहित विकारी, राकेश केदारी, संकेत केदारी, उमेश येवले, आदेश केदारी, अक्षय केदारी, विशाल केदारी, सौरव केदारी, अमित सपकाळ, विकी हेंद्रे, विलास कांबळे, नितीन गोणते, सुहास शिंदे, अजय गायकवाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजितदादा पवार म्हणाले ,” मागील ३० वर्षे राजकीय क्षेत्रात काम करत असताना मावळ मतदारसंघात पक्षाला विजय मिळवता आला नाही. मात्र सुनील शेळके यांच्यामुळे पक्षाला या जागेवर प्रचंड मतांनी विजय मिळवता आला. जनतेने आपल्याला मत देऊन त्यांची जबाबदारी पूर्ण केली. आता आपल्याला विकास कामे करून आपली जबाबदारी पार पाडायची आहे. सर्वांनी मिळून तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न करूया. अजितदादांनी पक्ष प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले व मान्यवरांचे पक्षात स्वागत केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले,”मागील अडीच वर्षात मावळ तालुक्यात विकासाचा झंझावात सुरू आहे. आमदार सुनिल शेळके यांच्या विकासाच्या संकल्पनेला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार भरभरून साथ देत आहे. कोट्यावधी रूपयांच्या विकास निधीतून मावळ तालुक्यात विकासाची घौडदौड सुरू आहे.
आमदार सुनिल शेळके म्हणाले,” मावळ तालुक्याच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करताना कितीही आटापिटा करावा लागला तरी बेहत्तर.आपल्या पाठीशी पक्षाचे लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची शक्ती आहे. या ताकदीवर विकासाचा महामेरू उभा करू. राष्ट्रवादी हे मोठे कुटूब आहे. या कुटूबियांची जबाबदारी हातात हात घालून घेऊ.

error: Content is protected !!