तळेगाव दाभाडे:
मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची मावळ तालुक्यातील कामांसंदर्भात दिल्ली येथे भेट घेतली.तसेच कार्यकारी संचालक तक्रार निवारण रेल्वे (EDP) श्री.संजीव देशपांडे यांना निवेदन दिले.
आमदार सुनिल शेळके म्हणाले,”
मावळ मतदारसंघातील लोणावळा पर्यटन क्षेत्र असून येथे वर्षभर पर्यटक येत असतात.तसेच शिक्षण, व्यवसाय व नोकरीनिमित्त दररोज लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु कोरोना काळापासून पुणे ते लोणावळा दरम्यान असलेल्या लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र आता कोविडचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे.तरी त्यादृष्टीने संबंधितांना आपण उचित निर्देश द्यावेत.
मावळ तालुक्यातील कान्हे व मळवली या दोन्ही रस्त्यांवरील रेल्वेक्रॉसिंगवर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कान्हे 𝐋𝐂-45 व मळवली 𝐋𝐂-30 येथे उड्डाणपुल उभारण्यात येणार आहेत. परंतु वारंवार पाठपुरावा करुनही या दोन्ही रेल्वे उड्डाणपुलांच्या कामाबाबत दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येत आहे.तरी या उड्डाणपुलांच्या कामांना गती मिळावी यासाठी आपण योग्य ती कार्यवाही करावी,अशी विनंती केली.मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही प्रश्न मार्गी लावण्यात येतील,असे आश्वासित केले असल्याचे आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले.

error: Content is protected !!