
वडगाव मावळ :
१२६ दिवसात सुमारे ३६०० किलोमीटर पायी प्रवास करून नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आलेल्या वडगाव शहरातील ज्ञानेश्वर (माऊली) ढोरे व शकुंतला ढोरे या दाम्पत्यांचे वडगाव शहरामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरामध्ये देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त गणेशअप्पा ढोरे, हभप मंगल महाराज जगताप यांच्या हस्ते सन्मान करून ढोरे दाम्पत्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी गुलाबराव म्हाळसकर, सोपानराव ढोरे, दीपक बवरे, मनोज ढोरे, अनिल गुरव, तुकाराम गाडे आदी उपस्थित होते.
१२६ दिवसांचा पायी प्रवास करून परतलेल्या ढोरे दाम्पत्याला पाहून वडगावकरांच्या भावना अनावर झाल्या. दरम्यान माजी राज्यमंत्री संजय भेगडे, भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्यासह अनेकांनी ढोरे दाम्पत्याचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
- एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट मिळवा:हाॅटेल शिवराजची खास ऑफर
- राऊतवाडीत गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तु , दप्तर ,वह्याचे वाटप हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचा उपक्रम
- मनसेची आंदर मावळात बैठक
- कुरणवस्तीची शाळा झाडांची शाळा:सरपंच सविता भांगरे
- गरजु मुलांसाठी एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत भोयरे येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप



