पवनानगर:
येथील पवना विद्या मंदिराचे उपक्रमशील शिक्षक भारत लक्ष्मण काळे यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली.काळे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
काळे यांच्या शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक,विज्ञान तंत्रज्ञान क्षेञातील उत्कृष्ट कार्याबद्दल व माध्यमिक शाळेतील विविध उपक्रमांची दखल घेऊन महाराष्ट्र शिक्षक पॅनल निवड समितीच्या वतीने त्यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कारासाठी निवड केली आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा दि.१५ मे २०२२ रोजी शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ, सिनेसृष्टीतील कलावंत व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी,पुणे येथे होणार आहे.पुरस्कार निवड महाराष्ट्र शिक्षक पॅनल पुणे जिल्हातील निवड समिती सदस्यअशोक ठाणगे सचिन तौर,संभाजी मंमाळे ,मकरंद आहेर आणि सर्व सदस्य पुणे टीम यांच्या वतीने करण्यात आली आहे.
या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल भारत लक्ष्मण काळे यांचे महाराष्ट्र शिक्षक पॅनल पुणे टिमच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. काळे हे वडगाव मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष असून दैनिक सकाळचे पवनानगर विभागाचे प्रतिनिधी आहे. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष,यशवंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे कार्यकारी संचालक आहे. मावळ तालुक्यातील विविध सामाजिक संस्था व संघटनांशी सबंधित असलेल्या काळे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.माजी आमदार शिक्षणमहर्षी कृष्णराव भेगडे,आमदार सुनिल शेळके, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे ,संस्थेचे उपाध्यक्ष गणेश खांडगे,सचिव संतोष खांडगे,प्राचार्या अंजली दौंडे यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!