अथर्व हॉस्पिटलमध्ये गरजूंना मोफत उपचार
तळेगाव दाभाडे :
येथील अथर्व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गरजूंसाठी मोफत उपचार सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचे उद्घाटन आ. सुनील शेळके आणि कृषितज्ञ डॉ. सुरेश धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, यादवेंद्र खळदे, सुरेश धोत्रे, चंद्रभान खळदे, पोलिस कमिश्नर गुन्हे अन्वेषण संभाजी कदम, राम जाधव आदी उपस्थित होते. समाजातील गरजू लोकांना या दवाखान्याचा निश्चितच लाभ होईल, असे प्रतिपादन आ. शेळके यांनी केले; तसेच डॉ. अजित माने व डॉ. राजेंद्र देशमुख म्हणाले की, या ठिकाणी मोफत जनरल तपासणीमध्ये इंजेक्शन व गोळ्या औषधे मोफत देण्यात येतील.

error: Content is protected !!