टाकवे बुद्रुक:
बुद्रुक कल्हाट पवळेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी कविता पप्पू पवार यांची बिनविरोध निवड झाली.
मावळते उपसरपंच प्रणाली अमोल आगिवले यांची मुदत संपल्याने आज घेण्यात आलेल्या निवडनुकीत कविता पप्पू पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने पवार यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली
ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच बिजाताई संतोष जाचक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने जाचक यांनी पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केली. त्यावेळी भाजपा अंदर मावळ अध्यक्ष गणेश कल्हाटकर, माजी चेअरमन नथु करवंदे माजी ग्रापंचायत सदस्य नंदू करवंदे, बबन आगिवले, भाऊ धनवे,माजी उपसरंपच जावेद मुलाणी माजी उपसरपंच रूपाली करवंदे,सदस्य सुभाष पवार,सदस्या हिना मुलाणी,सदस्य बुधाजी जागेश्वर,ग्रामसेवक शशिकिरण जाधव,दादाभाऊ कोयते, दशरथ यादव,मानिक तांबोळी,
भाऊ कल्हाटकर,परशुराम करवंदे, किसन यादव, सचिन पालवे, मचिंद्र करवंदे. लक्ष्मण देशमुख उपस्थित होते.

error: Content is protected !!