मावळ काँग्रेसचा भजन मोर्चा :महागाईचा निषेध
वडगाव मावळ :
मावळ तालुका काँग्रेसच्या वतीने सोमवार वाढत्या महागाईच्या निषेधार्थ वडगाव येथे तहसील कार्यालयावर भजन मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.
वडगाव मावळ येथील पंचायत समिती कार्यालयासमोरील चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, बाळासाहेब ढोरे, दिलीप ढमाले, तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली भजन मोर्चा काढण्यात आला . तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी निवेदन देण्यात आले.
मावळ तालुका काँग्रेसच्या वतीने सोमवारी वाढत्या महागाईच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर भजन मोर्चा काढण्यात आला. यादवेंद्र खळदे,संभाजी राक्षे, रोहिदास वाळुंज, सुभाष बुटाला, विलास मालपोटे, कौस्तुभ ढमाले, विशाल वाळुंज, अस्लम शेख, महादू खांदवे, भरत गरुड, मारुती साठे, अनंता मोहोळ, नितीन माने, आकाश खंडाळे आदी उपस्थित होते.
पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला.
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याला भाजपचे केंद्र सरकार जबाबदार असल्याने केंद्र सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन झाले.

error: Content is protected !!