
लग्न सोहळ्या मधील विधीवत कार्यक्रम सत्यनारायण पूजा व जागरण गोंधळाची धूम
टाकवे बुद्रुक:
मागील दोन वर्षांपासून कोरोणासारख्या महामारीने संपूर्ण जागतावरती हाआकार माजवला होता. दरम्यान लसीकरणाचे 2 डोस पूर्ण झाल्यामुळे हळूहळू परिस्थिती पूर्वपदावरती येऊन पूर्ववत होऊ लागली आहे.
परिणामी वास्तविक स्थिती पाहता सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना नियमावली नियम शिथिल केल्यामुळे पूर्वीप्रमाणे विवाह सोहळे संपन्न होऊ लागले आहेत.
दरम्यान टाकवे बुद्रुक येथील झालेल्या लग्न विधीतील पारंपारिक पद्धतीने त्यामधील एक विधीवत कार्यक्रम म्हणजे सत्यनारायण पूजा व जागरण गोंधळ या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मंडळी असतात ते वाघे म्हणजे मुरूळी .
पारंपारिक लग्न मधील मुख्य कार्यक्रम जागर गोंधळ बंद असल्यामुळे या कलाकारांनारती उपासमारीची वेळ ओढवली होती.
दरम्यान राज्य सरकारने लग्न सोहळ्यास पूर्व परवानगी दिल्या मुळे या कलाकारांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला आहे.
दरम्यान या कार्यक्रमास खंडोबा, काळभैरी, काळुबाई, शितळादेवी अशा प्रकारे या देवांचे अनेक भक्तजन आवर्जून जागरण गोंधळ या कार्यक्रमास उपस्थित राहतात. टाकवे वडेश्वर जिल्हा परिषद गटाचे भाजपा अध्यक्ष रोहिदास असवले यांच्या घरातील लग्न सोहळा कार्यक्रमानंतर जागरण गोंधळ उत्साहात पार पडला.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे



