राष्ट्रवादीच्या वडगाव शहराध्यक्षपदी ढोरे
वडगाव मावळ :
वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी आज वडगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य प्रवीण विठ्ठलराव ढोरे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी जेष्ठ नेते गणेशअप्पा ढोरे, किशोर भेगडे यांच्या उपस्थितीत ढोरे यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष मयुर ढोरे, गंगाराम ढोरे, साहेबराव कारके, किशोर सातकर, सुनील ढोरे, पंढरीनाथ ढोरे, राजेंद्र कुडे, राजेश बाफना, विशाल वहिले, अविनाश चव्हाण, अतुल राऊत, मंगेश खैरे, शरद ढोरे, सोमनाथ धोंगडे, भाऊसाहेब ढोरे, रोहिदास गराडे, मयुर गुरव उपस्थित होते.

error: Content is protected !!