वडगाव मावळ:
देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी अँड. प्रविण झेंडे यांची निवड करण्यात आली. मावळ तालूका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी निवडीचे पत्र दिले.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष गणेश ढोरे,तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे,वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे,देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृष्णा दाभोळे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव,राष्ट्रवादीचे मावळ तालुका कार्याध्यक्ष साहेबराव कारके,राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष किशोर सातकर,वडगाव शहर राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष राजेंद्र कुडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर,ओबीसी सेलचे प्रभारी अतुल राऊत, च॔द्रजित वाघमारे,विशाल वहिले,पंढरीनाथ ढोरे,गंगाधर ढोरे,धनराज शिंदे
यांच्यासह देहूरोड व वडगाव शहरातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले,” पक्ष संघटनेसाठी पदरमोड केलेल्या आणि वेळ दिलेल्या कार्यकर्त्याची निश्चितच दखल जाईल.कार्यकर्त्याचा मानसन्मान राखून पक्ष बळकटी साठी कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल.सतीश भेगडे यांनी सुत्रसंचालन केले.

error: Content is protected !!