पुणे :
लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या पुणे येथील राज्यस्तरीय कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब (ऑनलाईन द्वारे) व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. अजितदादा पवार , महसुलमंत्री मा.ना.बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री मा.ना.धनंजयजी मुंडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
‘लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंडे यांचे या क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन महामंडळाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.या महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबासाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी महाविकासआघाडी सरकार नेहमीच प्रयत्नशील असल्याचा विश्वास यावेळी देण्यात आला.
ऊसतोड कामगारांसह त्यांच्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी महामंडळ स्थापनेचा योग्य निर्णय घेण्यात आला आहे. ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून नोंदणी केल्यानंतर आधार जोडणी करून त्याच मजूरांना काम द्यावे लागणार आहे.त्यामुळे मजुरांचा त्रास वाचण्यासोबत कारखान्यांचाही फायदा होईल.मजुरांच्या मुलांच्या उच्च शिक्षणापर्यंत त्याची जबाबदारी भविष्यात महामंडळ घेणार आहे.चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये मुलांना शिक्षण देण्यासाठी अशा संस्थांशी करार करण्यासाठी प्रयत्न होणार आहे. तसेच महिलांच्या आरोग्याची जबाबदारी घेताना ऊसतोड कामगारांच्या विम्याची जबाबदारीही भविष्यात महामंडळाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.’
यावेळी आमदार सुनिल आण्णा शेळके , आमदार श्री.रोहित पवार, श्री.संजय दौंड, श्री.अतुल बेनके, श्री.सुनिल टिंगरे आदी मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!