निगडे:
हिंदु नववर्ष गुढीपाडवा व जागतिक महिला दिनानिमित्त
निगडे गावातील सर्व महिला-माता भगिनींसाठी होममिनीस्टर कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. प्रथम क्रमांक कविता भांगरे यांनी,द्वितीय क्रमांक कुंदा बधाले यांनी,तृतीय क्रमांक रेश्मा भांगरे ‌यांनी मिळवला.
निता चोरडिया सेलिब्रेटी अकर यांनी होममिनिस्टर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून स्पर्धेची रंगत वाढवली.
श्री काळभैरवनाथ मंदिरांच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. मावळ तालुका राष्ट्रवादीचे माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष बाबाजी गायकवाड , सरपंच सविता बबुशा भांगरे, उपसरपंच रामदास चव्हाण, माजी उपसरपंच भिकाजी भागवत ग्रामपंचायत सदस्य गणेश भांगरे,मंगरूळ सहकारी संस्थांवर संस्थेचे अध्यक्ष रूपेश घोजगे,शरद पवार,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे आंदर मावळ अध्यक्ष रविंद्र पवार,राजेश पानसरे, बाबाजी येवले ,योगेश थरकुडे ,सतिश थरकुडे संदेश शेलार,कल्पना भांगरे ,शितल भांगरे ,प्रियंका भोईर ,प्रियंका सा.भांगरे ,जयश्री भोईर उपस्थितीत होते. विजेत्या स्पर्धकांना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.लकी ड्राॅ मधून निवडलेल्या मृणाल भागवत या भाग्यशील महिलेसे गौरविण्यात आले.

error: Content is protected !!