शेलारवाडी येथे गुढीपाडवा उत्साहात साजरा
शेलारवाडी:
साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणारा गुढीपाडवा हा सण मावळ तालुक्यातील शेलारवाडी येथे उत्साहात साजरा झाला.सकाळपासूनच लोकांची बांबू धुण्यासाठी लगबग सुरु होती.इंद्रायणी नदी तसेच विहीरीवर जाऊन बांबू धुवून विधिवत पुजा करुन गुढी उभारण्यात आल्या.
महिलांनी अंगणात शेणाचा सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या.दारावरील मनमोहक फुलांची तोरणे सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.बालचमू गाठ्या खाण्यात तर जेष्ठ नागरिक एकमेकांची गाठ घेण्यात व्यस्त होते.
शेलारवाडी गावात सर्व उत्सव उत्साहात साजरे होत असल्याचे मत संदेश भेगडे यांनी व्यक्त केले.शेलारवाडी हे गाव शहराजवळ असूनही येथे जुन्या परंपरा व सण आनंदमय वातावरणात साजरे होतात अशी प्रतिक्रिया प्रा.लक्ष्मण शेलार यांनी व्यक्त केली.गुढीपाडव्यासारखे सण सर्वांना एकत्र आणण्यात मोठी मदत करतात असे मत योगेश माळी यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!