टाकवे बुद्रुक:
आंदर मावळातील पिंपरीत काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. किर्तनकार
ह.भ.प श्री.नितीनमहाराज काकडे यांनी काल्याच्या निमीत्ताने पार पडलेल्या हरी कीर्तनात भगवान श्रीकृष्णाचे चरित्र उभे केले.
मावळ तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम कदम,मावळ तालुका दिंडी समाजाचे अध्यक्ष तुकाराम गायकवाड,अंदर मावळ भाजप अध्यक्ष गणेश कल्हाटकर ,मावळ भाजप युवा मोर्चा सरचिटणीस सचिन पांगारे, माजी सरपंच राजेश कोकाटे,शंकर पिंपरकर, निवृत्ती पिंपरकर , व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. माजी उपसभापती शांताराम कदम यांच्या वतीने गावासाठी एक लाऊडस्पिकर संच भेट देण्यात आला.

error: Content is protected !!