मावळ तालुका दिंडी समाज अध्यक्षपदी तुकाराम गायकवाड
वडगाव मावळ:
मावळ तालुका दिंडी समाज अध्यक्षपदी तुकाराम सखाराम गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
आळंदी येथे मावळ तालुका दिंडी समाज धर्मशाळा येथे सर्व प्रमुख वारकरी पदाधिकारी सल्लागार समिती यांची बैठक झाली. यामध्ये एकमताने अध्यक्षपदी ह.भ.प. तुकाराम गायकवाड यांची निवड करण्यात आली. ही निवड तीन वर्षांसाठी राहणार आहे.
या वेळी माजी अध्यक्ष नरहरी केदारी, पंढरपुर बांधकाम समितीचे अध्यक्ष माउली शिंदे, माजी सभापती राजाराम शिंदे, काळूराम मालपोटे, तुकाराम असवले, शांताराम काजळे, बंडोबा सातकर, बबन कोंढरे, लक्ष्मण बालगुडे, धोंडिबा केदारी, रोहिदास धनवे, तुकाराम नाणेकर, गणेश काजळे, नारायण ठाकर, राजेंद्र सातकर उपस्थित होते.

error: Content is protected !!