अर्थसंकल्पीय अधिवेशनात मावळसाठी ९५ कोटी ८५ लाखांचा निधी
१८५ कोटी ६५ लाख रूपयांचे प्रस्ताव मंजुरीसाठी
वडगाव मावळ:
मार्च २०२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मावळातील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी सुमारे ९५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे. तर तालुक्यातील पर्यटन विकास, कोरडवाहू बागायती करण्यासाठी व कृषी पर्यटनास चालना देण्यासाठी उपसा सिंचन प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे तसेच ऐतिहासिक गावतळ्यांची दुरुस्ती व सुशोभीकरण करणे अशा महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी सुमारे १८५ कोटी ६५ लाख रूपयांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले आहेत, अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मावळ तालक्यात दरवर्षी सुमारे ४ हजार मिलिमीटर पर्यंत पाऊस पडत असल्याने निमशहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच नागरिकांची खराब रस्त्यांमुळे गैरसोय होऊ नये, याकरिता पावसामुळे खराब होणाऱ्या रस्त्यांच्या डागडुजीसाठी व रस्ते मजबूतीकरण आणि रुंदीकरण करण्याकडे आमदार शेळके यांनी विशेष लक्ष देऊन त्यासाठी अधिवेशनातून भरघोस निधीस मंजुरी मिळविली आहे.
सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मावळ तालुक्यातील बिगर अदिवासी सर्वसाधारण रस्त्यांसाठी ३७ कोटी ५ लक्ष रूपये, आदिवासी रस्त्यांसाठी ६ कोटी रूपये, विशेष रस्ते दुरुस्तीसाठी ११ कोटी रुपये, नाबार्ड अंतर्गत रस्ते सुधारणेसाठी ५ कोटी रूपये, पानंद रस्ते सुधारणा करण्यासाठी १३ कोटी २० लाख रूपये, सामाजिक न्याय अंतर्गत दलितवस्ती सुधारणा करण्यासाठी १ कोटी रूपये, बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी ६० लाख रूपये, ग्रामविकास निधी अंतर्गत गावांतील विविध विकास कामांसाठी १० कोटी रूपये, ग्रामीण मार्ग सुधारणेसाठी २ कोटी रूपये तसेच सुदुंबरे येथील श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ सुधारणा करण्यासाठी पहिल्या टप्प्यात १० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
पर्यटन, उपसा सिंचन, अग्निशमन यंत्रणासारख्या कामांचा यादीत समावेश आहे. वडगाव मावळ नगरपंचायत येथे पाणी पुरवठा योजनेसाठी ३३ कोटी ८३ लक्ष रुपये, आढले, डोणे, ओव्हळे व इतर गावांसाठी पवना उपसा सिंचन योजना राबविण्याकरीता ६० कोटी ५० लक्ष रूपये, ऐतिहासिक तळ्यांची दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यासाठी २७ कोटी १५ लक्ष रूपये, तळेगाव दाभाडे, लोणावळा नगरपरिषद व वडगाव आणि देहू नगरपंचायत हद्दीतील विद्युत वाहक तारा भूमिगत करण्याच्या कामासाठी ४१ कोटी ९० लक्ष रूपये, मावळ तालुक्यातील पुनर्वसित गावठाणामध्ये मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत विकासकामांसाठी ८ कोटी २० लक्ष रूपये, पर्यटन विकास अंतर्गत कामांसाठी ७ कोटी ९० लक्ष रूपये, मावळ तालुक्यातील १७ गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे यासाठी ३ कोटी ९७ लक्ष रूपये, वडगाव आणि देह् नगरपंचायत येथे अग्निशमन यंत्रणा उभारणेसाठी २ कोटी २० लक्ष रूपये अशा एकूण १८५ कोटी ६५ लक्ष रुपयांचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत.

error: Content is protected !!