
वडगाव मावळ:
जुन्या पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील छेद रस्ते जीवघेणे ठरत आहे.जुना पुणे मुंबई महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. मार्गावर अपघात होऊन कित्येकांचा नाहक बळी गेला. महामार्गावरील अपघात व वाहतुक कोंडी रोखण्यासाठी उड्डाणपुलाची गरज आहे. सुरक्षित रस्त्याच्या कामासाठी निधी मिळावा यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी दिल्ली येथे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले आहे.
आमदार सुनिल शेळके यांनी गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन जुना पुणे-मुंबई महामार्ग (NH4) वर होणारी वाहतुक कोंडी व वाढते अपघात याची माहिती दिली.
महामार्गावरील अपघात व वाहतुक कोंडी टाळण्यासाठी सेंट्रल चौक देहुरोड, सोमाटणे फाटा, लिंब फाटा तळेगाव, वडगाव, कान्हे, कार्ला इ.ठिकाणी उड्डाणपूलांची उभारणी होणे गरजेचे आहे.
यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडुन (MSRDC) केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेला आहे.परंतु सदर प्रस्तावावर अद्यापपर्यंत पुढील कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही.तरी या महत्त्वपूर्ण विषयावर संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरुन योग्य ते आदेश द्यावेत,अशी मागणी शेळके यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली.गडकरी यांनी त्वरित राज्य सरकारकडून प्रस्ताव मागिवण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या सचिवांना दिल्या आहेत.
- महावीर हाॅस्पिटल येथे डाॅक्टर डे साजरा
- रुग्णसेवेचे व्रत घेतलेले डॉ. विकेश कांतीलाल मुथा
- पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी जिल्हा बँकेमार्फत कर्ज देणार :- माऊली दाभाडे
- महिंद्रा कंपनी परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे आंदर मावळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी
- गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप



