सोमाटणे:
देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणारे आणि एकदा नाही तर दोनदा शेतक-यांचा सातबारा कोरा करणारे शरदचंद्र पवार साहेब,यांच्यावर टीका करण्याचा तुम्हाला कोणातच अधिकार नाही, खर तर प्रत्येकाने आपल्या पायरी प्रमाणे वागले पाहिजे. आणि तसच बोलले पाहिजे अशी बोचरी टीका मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी सदाभाऊ खोत याच्यावर केली.
खोत यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ सोमाटणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले,यावेळी खोत यांचा समाचार घेताना खांडगे यांनी खोत याच्यावर तोफ डागली.
आपला अवाका केवढा आणि आपण बोलतो किती असे वाचाळवीर आपल्या अलिकडे पहायला मिळत आहे असे सांगून खांडगे म्हणाले,”
लोकनेते आदरणीय पवार साहेब देशभरातील शेतकरी बांधवाना ज्यांनी कर्जमुक्ती दिली. इतिहास साक्षी आहे,छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर शेतक-यांना कर्ज मुक्ती देणारी,सुधारित बियाणे वापरा आणि फळबागा लावा,आधुनिक शेती करा,शेतीवर संपूर्ण कुटूंब व्यवस्था चालणार नाही म्हणून नोकरी आणि व्यवसायाची कास धरा अशी शिकवण पवारांनी दिली.
यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन घोटकुले, मावळ तालुका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष साहेबराव कारके,राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष किशोर सातकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे माजी कार्याध्यक्ष संतोष मु-हे, युवकचे माजी अध्यक्ष कैलास गायकवाड, पवन मावळचे अध्यक्ष भरत भोते. सचिन मु-हे,ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष अरूण गराडे, माजी सरपंच मनोज येवले,राकेश घारे,मनोज वाळुंज,गोरख जांभूळकर,नंदूभाऊ गराडे,अविनाश गराडे,सोमनाथ वाघोले,दिलीप राक्षे, राजू वाघोले,आकाश गायकवाड,पप्पू चांदेकर,सुशांत बालगुडे, यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे म्हणाले,” आमच्या नेत्यांवर केलेली टीका आम्ही सहन करणार नाही. सदाभाऊ यापुढे टीका केली तर मावळ तालुक्यातून जाणे कठीण होईल.
खांडगे म्हणाले,” सर्वसामान्य आणि सर्वसमावेशक नेते. त्यांच्यावर टीका केली तर राजकारणात मानाचे स्थान मिळते असे समजून अनेकांनी त्यांच्या वर टीका केली. पण स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणून घेणारे सदा भाऊ खोत यांनी ज्या पद्धतीने शब्द वापरले त्याचा निषेध करतो. सदाभाऊ आपले वय काय,आपले कर्तृत्व काय याची जाण ठेवा आणि मगच आमचे नेत्यावर टीका करा.
खांडगे पुढे म्हणले,” देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणारे आणि एकदा नाही तर दोनदा शेतक-यांचा सातबारा कोरा करणारे साहेब,यांच्यावर टीका करण्याचा तुम्हाला कोणातच अधिकार नाही. आपण ज्या संघटनेत काम करीत होता,त्या संघटनेतील फूट का पडली याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागले. सदाभाऊ,आम्ही राष्ट्रवादीचे शिलेदार आम्हाला आमच्या साहेबांचा स्वाभिमान आहेच. देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती,कित्येक राज्याचे मुख्यमंत्री त्याच्या कामाचा आणि कर्तृत्वाचा डंका वाजवत असताना आपल्या सारख्याला असे बोलणे शोभत नाही.अगदी खालच्या शब्दात बोलायचे तर सदाजी खोत आपली ती पातळी नाही.

error: Content is protected !!