वडगाव मावळ:
मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या उपस्थितीत वडगांव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली.
आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी वडगांव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेलच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला.
व आगामी काळात सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यरत राहून शहरात सभासद नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. कार्याध्यक्ष साहेबराव कारके, माजी सभापती गणेश ढोरे, जेष्ठ नेते मंगेश ढोरे, गंगाधर ढोरे, चंदुकाका ढोरे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, वडगाव शहराध्यक्ष राजेंद्र कुडे, नगरसेवक सुनिल ढोरे,मावळ तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष किशोर सातकर यांच्यासह सर्व सेलचे अध्यक्ष आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!