
सोमाटणे:
येत्या आठ दिवसात सोमाटणे टोलनाका बंद करण्या बाबत निर्णय घेण्यात यावा, अन्यथा जनसेवा विकास समितीसह तळेगावातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते तीव्र अंदोलन करतील असा इशारा जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी दिला.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या प्रयत्नातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट जनसेवा विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली.गडकरी यांनी लोकसभेत केलेल्या ६० किलोमीटरच्या आतील टोलनाका बंद करण्याच्या घोषणेचे आवारे यांनी स्वागत करून गडकरी यांचे आभार मानले.
सोमाटणेतील टोल नाका अनाधिकृत असल्याचे त्यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून देत केंद्र सरकार तर्फे हा तातडीने बंद करण्यात यावा असे लेखी निवेदन देण्यात आले.
केंद्रीय मंत्री गडकरी निवेदन काळजी पूर्वक वाचून त्यांचा निर्णय व केंद्राची भूमिका जनसेवेला समजावून सांगितली.हा टोलनाका हा राष्ट्रीय महामार्गावर असला तरी त्याचे पूर्ण अधिकार हे राज्य शासनाच्या ताब्यात दिलेले असून ह्या टोलनाक्या संदर्भात जे काही निर्णय घेण्याचा अधिकार आहे तो फक्त राज्यशासनाकडे राखीव असल्याचं त्यांनी सांगितले.राज्यशासनाच्या जी आर प्रमाणे राज्यशासनची मर्यादा ४५ किमी ची असून त्या मर्यादेत सुद्धा सोमाटणे टोलनाका बसत नाहीये.
हा टोलनाका अनधिकृत असल्याचे जनसेवा समितीने वेळोवेळी पुराव्यांनिशी सिद्ध करत आलो असल्याचे आवारे म्हणाले.
हा टोलनाका अधिकृत आहे. हे टोलनाका प्रशासनाने येत्या आठ दिवसात सिद्ध करावे.जर येत्या आठ दिवसात टोलनाका बंद करण्याबाबत पाठपुरावा झाला नाही.जनसेवा विकास समिती तसेच तळेगावातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते तीव्र आंदोलनाची घोषणा करत आहोत असा इशारा त्यांनी दिला.
- पुन्हा एकदा संस्कार प्रतिष्ठान महाराज्यच्या यशात मानाचा तुरा
- कान्हे रेल्वे उड्डाणपुलास ग्रामस्थांचा विरोध
भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन - वरसुबाई विद्यालयात वह्यांचे वाटप
- भारतीय जनता पक्ष उत्तर भारतीय आघाडी तळेगाव दाभाडे शहर कार्यकारिणी जाहीर
- हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ व पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप



