वडगाव मावळ:
आमदार अनिल भोसले यांचे स्थानीक विकासनिधीतून मावळ तालुक्यातील ४४ अनुदानित शाळांना अवांतर वाचनाची पुस्तकांचे वितरण न्यू इंग्लिश स्कूल वडगाव मावळ येथे झाले.
स्कूल कमिटी प्रमूख मनोज ढोरे,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड यांचे हस्ते झाले. राजेश गायकवाड म्हणाले,” व्यक्तीमत्व विकासासाठी जीवनात अवांतर वाचनाची गरज आहे.अवांतर वाचनाचे महत्व विशद करून ही पुस्तके मावळ मधील विद्यार्थी व शिक्षक यांना खूप उपयूक्त ठरतील अशा भावना व्यक्त केल्या.
आमदार अनिल भोसले यांचे या उपक्रमा बद्दल धन्यवाद व्यक्त करीत मनोज ढोरे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.या वेळी आमदार कार्यालयाचे वतीने प्रतिनिधी सचिन काळे, बाळासाहेब उभे,नारायण पवार,प्रकाश शिंदे,प्रतिभा चौधरी,बापू नवले,रमेश आरगडे,व अनेक मुख्याध्यापक बंधू भगीनी उपस्थित होते.
प्राचार्य उद्धव होळकर यांनी प्रास्ताविक केले.विठ्ठल माळशिकारे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!