कामशेत:
सिनेअभिनेते हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपर स्टार जॅकी श्राॅफने चांदखेडच्या गायकवाड कुटुंबियांचे घरी जाऊन सांत्वन केले. जॅकी यांच्या संवादात गायकवाड कुटुंबियांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली.
जॅकी यांचा लोणावळ्यात फार्म हाऊस आहे,येथे सागर दिलीप गायकवाड काम करतो.
सागरचे वडील दिलीप राजाराम गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सागर जॅकीच्या फार्महाऊसवर गेली पाच वर्षांंपासून काम करतोय. सागरच्या वडीलांचे निधन झाल्याची माहिती मिळताच गायकवाड कुटूबियांचे सांत्वन करण्यासाठी जॅकी त्यांच्या घरी आले.दिलीप यांच्या मातोश्री तान्हाबाई यांची भेट घेतली. चिमुकल्यांशी जॅकीने संवाद साधला. या सांत्वनाने गायकवाड कुटूबियांचे दु:ख काहीसे हलके झाल्याच्या भावना गायकवाड परिवारातील बंधू रमेश गायकवाड व वैभव गायकवाड यांनी व्यक्त केल्या. वेणूबाई किसन शिंदे यांच्याशी जॅकीने संवाद साधून दु:ख व्यक्त केले.
मागील वर्षी जॅकीच्या घरी काम करणाऱ्या दिपाली तुपे यांच्या आजीचे नुकतेच निधन झाले होते. ही बातमी जॅकीला ही बातमी कळल्यानंतर तो त्या महिलेच्या घरी गेला आणि त्याने कुटुंबियांचे सांत्वन केले होते.
जॅकी श्रॉफ हा केवळ एक खूप चांगला अभिनेताच नव्हे तर खूप चांगला व्यक्ती देखील आहे आणि त्याने आजवर हे सिद्ध देखील केले आहे. जॅकी गरिबांच्या मदतीसाठी नेहमीच धावून जातो. त्याच्या घरी काम करणाऱ्या महिलेचे सांत्वन करण्यासाठी मावळला गेला होता. आता फार्म हाऊसवर काम करणा-या मुलाचे वडील गेल्यावर सांत्वनासाठी घरी आला.
जॅकी श्रॉफने त्याचे बालपण एका चाळीत घालवले आहे. तो आज प्रचंड श्रीमंत असला तरी त्याचे ते दिवस तो आजही विसरलेला नाहीये. जॅकीने गेल्या काही वर्षांत खूप चांगली प्रॉपर्टी बनवली आहे. पुण्यातील मावळ येथील चांदखेड येथे जॅकीचा बंगला असून तो अनेकवेळा तिथे मुक्कामाला जातो. नुकताच तो मावळला गेला होतो. त्यावेळी त्याच्याकडे काम करणाऱ्या दिपाली यांच्या आजीचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले असल्याचे त्याला कळले. त्याने लगेचच दिपाली यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली.
जॅकी श्राॅफ म्हणाले,” सुख दु:खाचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. दु:ख झाले तर त्यावर मात करून पुढे जायचे असते. असे दु:खाच्या प्रसंगाला आम्हीही सामोरे गेलो आहोत. कुटूबियांतील प्राणप्रिय व्यक्ती गेली तर दु:ख होणे स्वाभाविक आहे. दु:ख सर्वानी मिळून सावरायचे असते.

error: Content is protected !!