वडगाव मावळ:
अनाथ निराधार व गरजु आदिवासी भागातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी लोकसहभाग वाढू लागला आहे.
कोरोना महांमारीच्या काळात आई वडीलांचे काम सुटल्याने,किवा आई वडील गेल्याने अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाची अडचणी निर्माण होत आहेत.अन्न,वस्त्र,निवारा व शिक्षण या मूलभूत सुविधांची गरज आहे . आई वडीलांचे छायाछत्र निघुन गेलेल्या मुलांचा आधार आपण होत आहोत, व आपल्या मदतीची व सहकार्याची या मुलांनसाठी आम्हाला गरज असल्याच्या भावना संदीप कल्हाटकर यांनी व्यक्त केल्या.
या मुलांची माय बाप होऊन सेवा करण्याची संधी तुम्हा आम्हाला हिंदवी स्वराज्य प्रतीष्ठाणच्या संकल्पनेतुन आलेली आहे. कुठल्या ही तालुक्या मध्ये कुठेही असे विद्यार्थी आढळल्यास हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ
पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य
यांना कळवा व त्या मुलाची पुढील शिक्षणाला मदत करण्याची जबाबदारी आम्ही घेवु असे आवाहन बंधु भगिनी मायबाप जनतेला आहे.
आपण सुद्धा या उपक्रमात सहभागी होऊन या लेकरां साठी दप्तर ,वही, पेन ,कपडे जसे जमेल तसे एक हात मदतीचा पुढे करावा असे आवाहन संदिप बबन कल्हाटकर,अध्यक्ष हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ
पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी केले.
अधिक माहितीसाठी-
9594464162/ 9763876007

error: Content is protected !!