पवनानगर :
मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांचा पवनानगर येथे सत्कार करण्यात आला. मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व जेष्ठ नगरसेवक यांची नुकतीच मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाली.
या निवडीनंतर खांडगे प्रथमच पवनमावळच्या दोऱ्यावर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आले होते,यावेळी पवनमावळातील अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.यानंतर पवनानगर येथे त्यांचा कार्यकर्त्यांनी सत्कार केला.
यावेळी करूंजचे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर,खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन नामदेव ठुले, माजी सरपंच व कृषी उत्पन्न बाजारसमितीचे संचालक चंद्रकात दहिभाते,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदू धनवे,माजी सरपंच बाळासाहेब मसुरकर, हनुमंत (लाला) गोणते,काळुराम उंबरकर,अनंता निंबळे, किरन बेनगुडे,पवना कृषी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मोहोळ,राजु खांडभोर, स्वप्निल भांतागळे,बाळासाहेब शेंडगे,पोपट राऊत,पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष राहूल मोहोळ, भाऊ मोरे, सचिन ठाकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना गणेश खांडगे म्हणाले की, ग्रामीण भागातील पक्षाची संघटना बळकट करण्यासाठी पुढील काळात प्रयत्न केले जातील .’घर तेथे कार्यकर्ता आणि गाव तेथे शाखा ‘ हे अभियान राबवले जाणार आहे.
यासाठी राष्ट्रवादी आपल्या दारी हा उपक्रम घेऊन गावातील कार्यकर्त्यांच्या समस्या जाणुन घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

error: Content is protected !!