वडगाव मावळ:
सर्व सामान्य जनतेच्या सेवेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सेल सक्रीय होऊन काम करतील असा विश्वास मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष खांडगे यांनी वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार सेल,जेष्ठ नागरिक सेल,ओबीसी सेल,भटक्या विमुक्त सेल,आदिवासी सेल,डाॅक्टर सेल,लीगल सेल,अल्पसंख्याक सेल,किसान सेल,औद्योगिक व व्यापार सेल,सोशल मीडिया सेल,क्रिडा सेल,सामाजिक न्याय विभाग,सेवादल,सरपंच परिषद,कामगार सेल,चित्रपट कला व सांस्कृतिक सेल,पदवीधर सेल,दिव्यांग सेलच्या कार्यकर्त्याची आढावा बैठक घेतली ,यावेळी खांडगे यांनी हा विश्वास दिला.
या सर्व सेलचे अध्यक्ष अनुक्रमे नामदेव शेलार,विष्णू शिंदे,मंगेश खैरे,दतात्रय गिरीगोसावी,विक्रम हेमाडे,राजेंद्र येळवंडे,सोमनाथ पवळे,अफताब सय्यद,दिगंबर आगीवले,नवनाथ हरपुडे,संजय शेडगे,विक्रमसिंह देशमुख,विकी लोखंडे,जालिंदर शेटे,सुनिल भोंगाडे,मंगेश राणे,वेदांग महाजन,अविनाश बधाले,सुभाष शेडगे यांनी आपल्या सेलच्या कामाचा आढावा देऊन आगामी काळात पक्ष संघटना वाढीसाठीच्या सुचना मांडल्या.
ज्येष्ठ नागरिकांसह इतर सेलच्या पदाधिकारींनी सुचना मांडल्या.विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना पक्षाचे ओळखपत्र द्यावे.
ग्रामीण भागातून शहरात कामासाठी जाणाऱ्या प्रवाशी नागरिकांना पीएमपीएलचे ओळखपत्र वडगाव शहरात उपलब्द व्हावे ,जिथे पास सेंटर उपलब्द करून द्यावे. वैद्यकीय सुविधेसाठी विभागनिहाय आरोग्य शिबिर घेण्याच्या सूचना ज्येष्ठांनी केल्या. तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या सोयीसाठी आदिवासी प्रकल्प विभागीय कार्यालय वडगाव मावळ येथे सुरू करावे अशी मागणी केली. पक्षाच्या या सेल सह आपत्कालीन मदत सेल स्थापन करण्याची घोषणा खांडगे यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेलच्या तळेगाव शहर अध्यक्ष नंदकुमार सोपना कोतुळकर , कामशेत शहर अध्यक्ष पदी बाबुराव पवार, वाकसई गण अध्यक्ष पदी बबनराव येवले, तालुका उपाध्यक्ष पदी सुधाकर वाघमारे ,वडेश्वर गण अध्यक्ष पदी शांताराम जगताप यांची निवड करण्यात आली. सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाचा आढावा देऊन सूचना केल्या,या सूचनांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन खांडगे यांनी दिले.

error: Content is protected !!