आंदर मावळ भागात निगडी ते टाकवे बुद्रुक पीएमपीएमएल बससेवा सुरू
टाकवे बुद्रुक :
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने सुरू केलेल्या निगडी ते टाकवे बुद्रुक बसला मावळ तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश खांडगे व राजू शिंदे यांनी झेंडा दाखवून उद्घाटन केले. एसटी महामंडळाचा संप सुरू झाल्या पासून आंदर मावळातून शहरात जाणा-या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाने बस सेवा सुरू करावी अशी मागणी नागरिकांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे केली होती.याच प्रश्नी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केला होता.
टाकवे बुद्रुक हे आंदर मावळ मधील ४० ते ४२ गावाचे मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असून या भागामध्ये औद्योगीकरण मोठ्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागाला जोडण्यासाठी निगडी ते टाकवे बुद्रुक पीएमपीएल बस सुरू करावी अशी मागणी काही दिवसापूर्वी आंदर मावळ प्रवासी संघटना अध्यक्ष राजू शिंदे,आंदर मावळ राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मारुती असवले, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष अनिल असवले, माजी चेअरमन विकास असवले,माजी चेअरमन दत्ता घोजगे माजी उपसरपंच स्वामी जगताप यांनी केली होती.
पीएमपीएमएल वाहतूक विभाग पुणे, तसेच पिंपरी चिंचवड विभागातील अधिकारी यांनी
व आमदार सुनिल शेळके यांनी देखील यामध्ये विशेष प्रयत्न केल्यामुळे टाकवे बुद्रुक येथे ढोल-ताशांच्या गजरामध्ये पीएमपीएल प्रवासी बसचे उद्घाटन हिरवा झेंडा दाखवत मावळ तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष गणेश खांडगे,आंदर मावळ प्रवासी संघटना अध्यक्ष राजू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
पीएमपीएल अधिकारी झेंडे, ढोरे, व त्यांचे इतर सहकारी, सरपंच भूषण असवले, उपसरपंच परशुराम मालपोटे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नारायण ठाकर, उद्योजक सुधाकर शेळके, शिवाजी असवले,सदस्य सोमनाथ असवले, माजी उपसरपंच ऋषीनाथ शिंदे, सदस्य जिजाबाई गायकवाड, ज्योती आंबेकर, सुवर्णा असवले, संध्या असवले, प्रतीक्षा जाधव, ग्राम विकास अधिकारी सुभाष बांगर, अविनाश असवले उपस्थितीत होते.
निगडे येथून सकाळी 5 वाजून 40 मि. नी बस सुटणार.टाकवे बुद्रुक येथे मुक्कामी असणारी एसटी सकाळी 06 वाजून 05 मिनिटांनी सुटणार आहे.
दरम्यान एक तासाच्या अंतरावरती बस सुटणार आहेत.
टाकवे बुद्रुक ला मुक्कामी येणारी एसटी निगडी येथून 09 वाजून 50 मिनिटांनी सुटणार आहे. तसेच टाकवे बुद्रुक येथून निगडी ला जाणारी शेवटची एसटी रात्री 10 वाजून 45 मिनिटांनी सूटणार आहे.

error: Content is protected !!