पिंपरी:
मावळ तालुक्यातील सर्व सामान्य जनतेची रूग्ण सेवा करणा-या महावीर हाॅस्पिटलने निगडी प्राधिकरणात रेडीयंट युनिट सुरू केले आहे. या नव्या व्यवसायाचा शुभारंभ मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे व कांचेनबेन कांतीलाल मुथा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार अण्णा बनसोडे, नगरसेवक प्रमोद कुटे,नगरसेवक अनुप मोरे, नगरसेवक अमित गावडे,
जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे,डाॅ. श्रीकृष्ण जोशी, नटराज कला क्रीडा प्रतिष्टानचे अध्यक्ष महेश स्वामी,डाॅ. जयंत श्रीखंडे, राजेश बंग, माजी मनसे अध्यक्ष कैलास जाधव, महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा, पोलीस निरीक्षक संजय जगताप,पिंपरी चिंचवड लेडीज असोसिएशनच्या अध्यक्षा पूनम परदेशी, अभिमन्यू शिंदे,रतेश गदिया,राकेश जैन, डाॅ. रितेश जैन, डाॅ. सुमित सोलंकी,डाॅ. यस्मीम कोयल,डाॅ.प्रशांत टाटिया,डाॅ. नितीन राठोड,डॉ.आकाश टाटिया,डाॅ. दत्तेश गोरे, डाॅ.भाविका जैन,डाॅ. मनाली जैन, गणेश भोकरे,गणेश घोगरे उपस्थितीत होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले,” शहरातील नव्या पिढीला सर्व सुविधा एकाच दालनात देणारे हे उत्तम असे दालन आहे. ज्याचा लाभ तरूण पिढी नक्कीच घेईल. कोरोनाच्या काळात आरोग्य व सुंदरते कडे दुर्लक्ष झाले आहे. ती उणीव भरून काढण्याची संधी रेडीयंटने उपलब्ध केली आहे.
महावीर हाॅस्पिटलचे रेडीयंट युनिट आपल्या सेवेसाठी सुरू झाले आहे. आपल्या सेवेसाठी वेगवेगळ्या उपचारासह आपला आत्मविश्वास वाढविण्यासाठी हे दालन निश्चितच उपयुक्त ठरेल असा व्यक्त अनेकांनी केला आहे.
जग बदलत चाले आहे तसे जगा सोबत आपणालाही बदलावे लागणार आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. हा नियम जसा निसर्गाला तसा आपणाला आहे.
निगडी प्राधिकरणात महावीरच्या भव्य दिव्य दालनात आपणाला डाग कमी करणे,लेसर पुनरुस्थान, प्लेटलेट समृद्ध प्लाजमा,त्वचा रंगद्रव्य कमी करणे,त्वचा उजळणे त्वचा व केसांचे विकार ,निदान आणि उपचार, लेजर च्या साहाय्यने नको असलेले केस कमी करणे, तीव्र स्पंदीत प्रकाश थेरपी, स्ट्रेच मार्क कमी
करणे, कापिंग,लेसर / केमिकल पिल,हायड्रा फेशिअल
,फोटो फेशिअल,गल्वनिक फेशियल,केस प्रत्यारोपन या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अंजना मुथा यांनी स्वागत केले. परेश मुथा यांनी सुत्रसंचालन केले. निलेश मुथा यांनी आभार मानले. अधिक माहितीसाठी: 90024244008,9002434009

error: Content is protected !!