वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस
च्या अध्यक्षपदी किशोर पंढरीनाथ सातकर यांची निवड करण्यात आली. माजी राज्यमंत्री मदन बाफना,माजी आमदार कृष्णराव भेगडे,आमदार सुनिल शेळके, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते सातकर यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे,माजी सभापती विठ्ठलराव शिंदे,तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, माजी उपनगराध्यक्ष सुरेश चौधरी,माजी उपनगराध्यक्ष अशोक भेगडे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे,राष्ट्रवादीच्या
महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, नगरसेवक व तळेगाव शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश काकडे, कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, जिल्हा युवकचे अध्यक्ष सचिन घोटकुले उपस्थित होते.
वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नियुक्ती पत्र देण्यात आले. सातकर यांचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!