विधी मंडळातील मावळ तालुक्याचा बुलंद आवाज
मावळमित्र न्यूज विशेष:
ऐतिहासिक व आध्यात्मिकेचा वारसा लाभलेल्या मावळ तालुक्याचा राजकीय दबदबा राज्यभर पोहोचवणारे माजी राज्यमंत्री मदन बाफना ,मावळवासियांचे प्रेरणास्थान आहे. नव्याने राजकारणाची ओढ असलेल्या आजच्या पिढीला बाफना साहेबांचा झंझावात जवळून अभ्यासात येईल,इतका मोठा त्याच्या कामाचा आवाका आहे. राष्ट्रवादीचे नेते,लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर त्यांची प्रचंड निष्ठा आणि श्रद्धा. या श्रद्धेतूनच पवार साहेबांच्या विशेष गोटातील विश्वासू सहका-यांपैकी बाफना साहेब एक मोठे नाव.
बाफना साहेबाना राजकीय आणि सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा त्यांचे वडील स्व. हरकचंद बाफना याच्या कडून मिळाला. तालुक्याच्या गावातील वडगावच्या बाजारपेठेत त्यांचे किराणा मालाचे दुकान. येथे फक्त रोखीचा व्यवहार होत होता असे नाही,तर मावळातून येणा-या तळागाळातील सर्वसामान्य माणसाचे हे आधाराचे केंद्र होते. येथील बैठकीतच बाफना साहेबांवर समाजकारणाचा आणि राजकारणाचे धडे गिरवले गेले . बी.ए.एल .एल.बी..चे शिक्षण घेतलेले बाफना साहेब कायद्याचे मोठे तज्ञ. 
राजकारणातील सगळा रूबाब त्याच्या ठायी होता. ते यशस्वी राजकारणी ठरले. राजकारणातील खूप मोठी उंची त्यानी गाठली होती. बैलजोडी या निवडणूक चिन्हावर त्यांनी जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक लढवली. आणि तालुक्याचे सभापती झाले,सभापती पदाची प्रतिष्ठा आणि उंची वाढली.मावळ वासियांनी बाफना साहेबांना भरभरून प्रेम दिले,मोठ्या मताधिक्याने त्यांना विधीमंडळात पाठवले.मावळच्या या वाघाने विधीमंडळ गाजवले. तालुक्याच्या विकासाची गंगा आणली. कोणी मानो अगर न मानो मावळच्या विकासाचे शिल्पकार ही उपाधी बाफना साहेबांवर शोभून दिसली. लोकनेते पवार साहेबांच्या विश्वासातील बाफना साहेबांवर सोपवलेली जबाबदारी त्यांनी समर्थ पणे पार पाडली. 
तालुक्यातील सार्वजनिक व वैयक्तिक कार्यक्रमात बाफना साहेबांचे येणे त्या कार्यक्रमाची उंची कित्येक पट वाढवणारी आहे. प्रत्येकाशी संवाद साधण्याची कला,ती लकब कोणालाच यायची नाही. भाषण विधीमंडळात असो की,सभेतील भाषण असो की दशक्रियेत तील भाषण. लग्न सोहळा अशा सुख दु:खाच्या कित्येक घटनेते बाफना साहेबांचा कायमच रूबाब राहिला. शब्दसंग्रहाचा मोठा ठेवा असलेले बाफना साहेबाची शब्द फेकण्याची कला काही वेगळीच. 
प्रशासनावर त्यांची मोठी कमांड होती,अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची हातोटी काही वेगळीच. कित्येकांना त्यानी राजकारणात आणले,मोठे ही केले. स्व.पंतप्रधान राजीव गांधी साहेबांना पुणे शहरात झालेल्या काँग्रेस पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात बाफना साहेबांनी फेटा बांधला होता. साहेबाची फेटा बांधण्याची हातोटी सध्या तरी कोणाला अवगत नाही. प्रत्येकाला आपल करण्याची आणि विरोधकांच्या संकटात धावून जाण्याचे मोठेपण फक्त बाफना साहेबांकडेच असू शकते, त्याच्या अंगी असलेल्या उपजत नेतृत्व गुणाला त्यांनी मोठ्या स्वयंशिस्तीने वाढवले, 
राजकारणातील मानाचे पद मोठ्या दिमाखाने त्यानी मिळवले आणि तितक्याच सन्मानाने सोडले.त्याच्या रूबाबदार राजकारणातील घटना आजच्या पिढीने अभ्यासल्या जाव्यात इतक्या उंचीच्या आहेत. 
जिल्हा परिषद सदस्य,सभापती,आमदार,राज्यमंत्री , पालकमंत्री,महसूल आणि विधी खात्याचे मंत्री अशी यशाची एक एक पायरी चढणारे बाफना साहेबांचे सर्वात जास्त माया आणि प्रेम त्याच्या आईवर होते. आयुष्यातली सर्वात मोठेपणा त्यांनी आईला दिला. आई या रूपाची उंची त्यांनी कायम ठेवली. कुटूंबवत्सल बाफना साहेबांचा आज वाढदिवस,या वाढदिवसानिमित्त साहेबांना हार्दिक शुभेच्छा..
(शब्दांकन- पै.रमेश नारायण गायकवाड,माजी अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस)

error: Content is protected !!