मावळमित्र न्यूज विशेष:
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांतील या तरुणांची लोकनेते शरदचंद्र पवार साहेब यांच्यावरील निष्ठा सर्वश्रुत आहे.उद्योजक म्हणून स्वतःचे वेगळेपण जपणा-या या तरूणांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,सुनेत्रा वहिनी पवार,युवा नेते पार्थदादा पवार यांच्यावर तितकीच श्रद्धा आणि निष्ठा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश चिटणीस पदाची तीन वेळा जबाबदारी स्वीकारून ती यशस्वीपणे पार पाडणा-या विक्रम चिंतामण कदम या जीवाभावाच्या सहकारी मित्राचा आम्हाला नितांत आदर आहे. तो त्यांच्या कर्तृत्वावर,त्याच्या कष्टावर,त्याच्या कामावरील निष्ठेवर.पवार कुटुंबियांशी जवळीक असलेल्या विक्रम कदम या तरूणाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गुडबुक मध्ये आपले नाव कमावले आहे.
जसे विक्रम कदम यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कुटूबियांशी वैयक्तिक सलोखा आहे.
विक्रमचे वडील कै.चिंतामण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमने व्यवसाय करण्याचे धडे लहानपणीचे गिरवले.कै.चिंतामण कदम काका दूरदृष्टी असलेले शेतकरी होते. पाॅलीहाऊस पासून सुरू झालेला व्यवसाय कारखानदारी पर्यत पोहचला. एक मित्र म्हणून या यशस्वी उद्योजकांचा आम्हाला गर्व आहे. विक्रम कदम यांच्या आयुष्यातील सर्वात मानाचे स्थान उपमुख्यमंत्री अजितदादा यांनाच जाते. व्यवसायातील अडीअडचणीत दादांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळतो.
या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश चिटणीस पदावर तीन वेळा संधी मिळाली. सुनेत्रा वहिनी पवार,युवा नेते पार्थदादा पवार,आमदार सुनिल शेळके यांचे मार्गदर्शन घेऊन राजकारणातील एक एक पायरी चालत प्रदेश पातळीवर काम करायचे आहे.
व्यवसाय व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना या दोनच आघाड्यांवर काम करण्याचा मनसुबा असलेला विक्रमला मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी कायमच प्रेरणा व प्रोत्साहन दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश खांडगे व नगरसेवक गणेश काकडे बंधुतुल्य मार्गदर्शक ,मित्र,सहकारी, नेते अशा अनेक भूमिका आमच्या मित्र परिवारासोबत निभावत आहे. त्यांचे सहकारी असल्याचाही विक्रमसह आम्हाला सर्व मित्र परिवाराला अभिमान आहे. विक्रम कदम या आमच्या जिवाभावाच्या मित्राला व्यवसायात अधिक समृद्धी बहरून येऊ दे,आणि राजकारणातील मानसन्मानाच्या पदाने पायघड्या घालू दे याच विक्रमशेठ ला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..
(शब्दांकन:शिवाजी असवले,टाकवे बुद्रुक. राज खांडभोर,नागाथली)

error: Content is protected !!