औदर सोसायटीवर राष्ट्रवादीचा झेंडा
भैरवनाथ शेतकरी सहकारी परिवर्तन पँनलची एकहाती सत्ता
औदर:
औदर (ता.खेड) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या १३ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भैरवनाथ शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनेलने सर्वच्या सर्व जागा जिंकून शिगेश्वर शेतकरी विकास पॅनेलचा दारूण पराभव केला.
तबाजी यमनाजी मेदगे, वामन होजगे यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या श्री भैरवनाथ शेतकरी सहकारी परिवर्तन पँनलने शिंगेश्वर शेतकरी विकास पँनलची अनेक वर्षीच्या सत्तेला सुरुंग लावून सत्ता मोडीत काढली.
औदर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या १३ जागांसाठी शनिवारी (दि.१२) रोजी अत्यंत चुरशीने मतदान झाले. मतदानानंतर मतदान केंद्रावर रात्री उशिरा पर्यंत मतमोजणी करण्यात आली.
नारायण मेदगे, कैलास मेदगे, भागुजी मेदगे,किसन मेदगे,भागुजी भारमळ, अर्जुन होजगे, बाजीराव होजगे,यशवंत होजगे, रोहीदास होजगे,गबाजी चौरे, अंजनाबाई मेटल,नकुशा बापु मेदगे,मनगीर गोसावी हे सर्व जण या निवडणूकीत विजयी झाले.आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते विजयी उमेदवाराचा सत्कार करण्यात आला.
निवडणूक निर्णय अधिकारी जे.बी.मुलाणी होते सचिव महेश बच्चे यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले.
निकालानंतर श्री भैरवनाथ शेतकरी सहकारी परिवर्तन पँनलच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटप करत फटाके वाजवून, गुलाल भंडारा-याची उधळण करीत जल्लोष केला. विजयी उमेदवारांचे वाडीकर तरुण मंडळे, विविध गावचे सरपंच, उपसरपंच विविध संस्थांच्या पदाधिकार्या सह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!