दिशा संस्थेमार्फत महिला मेळाव्याचे आयोजन
बुधवडी :
८ मार्च जागतिक महिला दिन हा दिवस महिलांबद्दल आदर व सन्मान व्यक्त करण्याच्या उद्देशाने सर्व जगभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिशा संस्था अनेक वर्षापासून ग्रामीण भागातील व मागासवर्गीय मुली व महिला सक्षमीकरण व महिलाचा सर्वांगिण विकास व्हावा या उद्देशाने कार्य करत आहे.
८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त दिशा संस्थेमार्फत संस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडियर रघुनाथ जटार व विश्वस्त इंदू गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे प्रकल्प अधिकारी प्रविण भोईरकर यांनी बुधवडी गावामध्ये महिला मेळाव्याचे आयोजन केले.
महिला दिनाबद्दल माहिती सांगण्यात आली. त्याच बरोबर महिलांवरील होणारे अत्याचार यावर पथनाट्य सादर करण्यात आले.
मुलगा मुलगी एक समान या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. त्याच प्रमाणे महिलाच्या दैनदिन जीवनावर आधारित खेळ घेण्यात आले. त्यामध्ये धावपळ माझी लय भारी, तारेवरची कसरत, चला चाॅकलेट खाऊ, एकञ राहू, मी नाती जोडते, कधी मी पुढे तर कधी मी मागे, गोल गोल फिरु, या खेळांच्या माध्यमातून महिला आपल्या आयुष्यात येणार्‍या प्रत्येक समस्या,आवाहने, संकटे, यांना तोंड द्यावे लागते. महिला या सर्वावर कशा प्रकारे मात करतात. या खेळाच्या माध्यमातून महिलांना संस्थेचे प्रकल्प अधिकारी प्रविण भोईरकर यांनी सांगितले.
सर्व खेळाचे नियोजन दिशा संस्थेच्या ग्रामसखी सुनिता थोरवे, स्नेहल थोरवे, वर्षा टाकळकर, प्रिती टाकळकर, ॠतुजा शिरसट, अनिता थोरात, प्रियंका वाघमारे, ॠतुजा मोहिते यांनी केले.
या महिला मेळाव्यामध्ये वाडिवळे, वळक, मुंढावरे, बुधवडी, वेल्हवळी, नेसावे, उंबरवाडी व फांगणे या गावातील एकूण १८० महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी सर्व गावातील महिला ग्रामपंचायत सदस्या उपस्थित होत्या.

error: Content is protected !!