निर्वस्त्र करुन महिलेचा खून
माळेगाव बुद्रुक:
पडाळीतील जनावरांना पाणी पाजायला गेलेल्या विवाहित महिलेला अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना रविवारी (दि. १३) दुपारी ३ वाजता तळपेवाडी माळेगाव बुद्रुक ता. मावळच्या हद्दीत घडली. या महिलेच्या हत्येने आंदर मावळ हादरले असून लेकी सुनांची सुरक्षितता प्रश्न ऐरणीवर आला आहे.
फसाबाई साळू निसाळ वय ३६ रा. तळपेवाडी, माळेगाव बुद्रुक ता. मावळ असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार,” फसाबाई निसाळ व त्यांचे पती साळू निसाळ हे ठोकळवाडी धरणाच्या बॅक वाॅटरला असलेल्या शेतात फरसबी लावण्याचे काम करीत दुपारी होते. दुपारी पडाळी तील जनावरांना पाणी पाजण्यासाठी फसाबाई निसाळ गेल्या व साळू निसाळ शेतात काम करत होते.
सायंकाळी साळू पडाळी वर गेले असता, पत्नी रक्ताच्या थारोळ्यात निर्वस्त्र पडल्याचे पाहिलं. वडगाव पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची माहिती देताच पोलीस हवालदार श्रीशल कंटोळी व होमगार्ड सुरेश शिंदे यांनी धाव घेतली.मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.
या खुनाच्या गुन्ह्याचे कारण समजले नाही आरोपींना अटक करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

error: Content is protected !!