सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ च्या वतीने आंदर मावळातील शिंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रीडा साहित्य वाटप
वडेश्वर :
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अंतर्गत सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ च्या वतीने मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील आंदर मावळ येथील शिंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने लेझीम,ढोल ताशा,डबेल्झ,घुंगरूकाठी,क्रिकेट खेळासाठी लागणारे बॅट,बॉल,स्टम्प्स,लगोरी,फुटबॉल आदी साहित्य देण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.उपस्थित सर्वच मान्यवरांचा शाळेच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला.
सहयाद्री विद्यार्थी अकादमी प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे.अतिदुर्गम भागातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप,शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनवणे प्रशिक्षण शिबीर,किल्ले बनवणे स्पर्धा कोरोनाच्या काळात मुलांसाठी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा तसेच राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा आदी कार्यक्रम मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सतत राबवले जातात.तसेच शैक्षणिक विकासाबरोबरच शारीरिक विकास होणे ही महत्वाचे असते.त्यासाठी विविध खेळ आवश्यक आहेत हीच गरज ओळखून सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मैदानी खेळाचे साहित्य देण्यात येत असते,असे मत आपल्या प्रस्ताविकामध्ये सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मावळ चे अध्यक्ष सचिन शेडगे यांनी मांडले.
प्रसंगी व्यासपीठावर मावळ शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजूभाऊ खांडभोर,केंद्रप्रमुख रघुनाथ मोरमारे सर,ग्रामपंचायत सदस्य शिवराम शिंदे,शालेय समिती अध्यक्ष योगेश खांडभोर, उपाध्यक्ष आनंद खांडभोर,शालेय शिक्षण समिती मा.अध्यक्ष दत्ता खांडभोर,सामाजिक कार्यकर्ते भरत शिंदे,विजय,पवार,कुंडलिक लोटे तसेच सह्याद्री प्रतिष्ठान व सह्याद्री विद्यार्थी अकादमीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.त्यामध्ये सह्याद्री प्रतिष्ठान मावळचे मा.अध्यक्ष सदानंद पिलाणे,सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळचे अध्यक्ष किरण ढोरे,संपर्कप्रमुख चेतन ढोरे, देहूरोड शहर अध्यक्ष लक्ष्मण शेलार,सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य मनीष जैन, किशोर वाघमारे, अमर गवारे,समीर काठे,अजित राजया,बाळासाहेब जमादार, सह्याद्री विद्यार्थी अकादमी वडगांव शहर महिला अध्यक्षा रुपाली तापकीर आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता धन्वे, गोकुळ लोंढे, सर्व शिक्षक वृंद, शालेय समितीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश माळी सर यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार सह्याद्री विध्यार्थी अकादमी मावळ चे अध्यक्ष किरण ढोरे यांनी मानले.

error: Content is protected !!