वडगाव मावळ :
सरकारी वकिलाला शिवीगाळ व दमदाटी करून केस त्यांच्या सोयीनुसार चालविण्यासाठी दबाव टाकणाऱ्या तीन जणांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सरकारी वकिल प्रेमकुमार सुंदरलाल अगरवाल (वय-50 वर्षे, अति.सरकारी वकिल रा. विठ्ठल आंजन अपार्टमेंट, गणेशनगर, बोपखेल पुणे- 31 ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अँड विपुल दुशिंग, अँड सौरभ दाभाडे (अँड दुशिंग यांचे ज्युनिअर वकिल ) व अँड रविंद्र पवार (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि. 11) रोजी दुपारी 1.50 च्या सुमारास ही घटना वडगाव मावळ येथे सत्र न्यायालयातील न्यायदान.कक्षामध्ये घडली.फिर्यादी यांचेवर झालेल्या आरोपामुळे व्यथित होवून त्यांनी सदर बाबत पुणे येथील सहायक संचालक व सरकारी वकील या कार्यालयास कळविणे बाबत व त्यांचे कडून सदरचे प्रकरण फिर्यादी यांनी चालवावे किंवा कसे याबाबत आदेश प्राप्त करुन घेईपर्यंत
सदर प्रकरणाची सुनावणी तहकुब करण्याची विनंती मा. न्यायालयाला अर्जाद्वारे केली होती. मा. न्यायालयाने त्या अर्जावर आरोपींना त्यांचे म्हणणे सादर करणे बाबत सांगितले.
त्याप्रमाणे आरोपीचे वरील वकिलांनी त्यांचे म्हणणे दुपारी 01:45 वा दाखल केले. ते म्हणणे वाचुन मा.न्यायालयाने सदर प्रकरणात फिर्यादी यांना अर्जात केलेल्या विनंती नुसार आदेश प्राप्त करून घेण्यासाठी दहा दिवसांची मुदत देवुन, सुनावणी तहकुब केली. त्यानंतर मा न्यायाधिश हे दुपारचे सुट्टीसाठी 01:50 वा त्यांचे कक्षात गेले असता आरोपी मजकूर यांनी न्यायदान कक्षातच उपस्थित सर्व वकिलांसमोर व न्यायालयीन कर्मचा-यासमोर फिर्यादी यांच्यामुळे सुनावणी तहकूब झाली असा गैरसमज करुन फिर्यादी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली व मारहाण करण्याची धमकी दिली तसेच झटापटी केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी वडगाव पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

error: Content is protected !!