
अतिदुर्गम निळशी शाळेत शालेय साहित्याचे वाटप
निळशी:
लीलावती भगवानदास ट्रस्ट अॉफ एज्युकेशन यांजकडून मावळ तालुक्यातील आंदर मावळातील शेवटचे टोक असणाऱ्या अतिदुर्गम निळशी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब घुडे यांनी विशेष प्रयत्न केले.यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी खांडी ग्रामपंचायतीचे सरपंच अनंता पावशे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास घुडे,पोपट घुडे,सुभाष म्हसे,रविंद्र घुडे,द्रोपदा देशमुख,मुख्याध्यापिका संगिता दाते इ.उपस्थित होते.
ट्रस्टच्या वतीने वह्या,पेन,पेन्सिल इ.साहित्य प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करुन शैक्षणिक विकास साधावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून हे ट्रस्ट सामाजिक कार्य करत असते.ट्रस्टच्या या उपक्रमाचे आंदर मावळ परिसरात कौतूक केले जात आहे.
- पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी जिल्हा बँकेमार्फत कर्ज देणार :- माऊली दाभाडे
- महिंद्रा कंपनी परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे आंदर मावळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी
- गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
- बेलज येथे मदुरा मायक्रोफायनान्स लिमिटेड’ आणि ‘क्रेडिटऍक्सेस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाड्यांसाठी आवश्यक साहित्य वितरण
- एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट मिळवा:हाॅटेल शिवराजची खास ऑफर



