
टाकवे बुद्रुक:
पाच राज्यांतील निवडणूका पैकी उत्तर प्रदेश,गोवा,उत्तराखंड,मणिपुर या चार राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केले आणि त्याच यशाचा आनंदोत्सव टाकवे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने साजरा करण्यात आला .
यावेळी किसान संघाचे अंदरमावळ अध्यक्ष मा.श्री.राजाराम वि.असवले,माजी चेअरमन मा.श्री.राजुशेठ शिंदे,टाकवे वडेश्वर गटाचे अध्यक्ष मा.श्री.रोहिदास असवले,टाकवे भाजप अध्यक्ष मा.श्री.दत्ता रामभाऊ असवले,जेष्ठ नेते मा.श्री.तुकाराम कोद्रे, माजी चेअरमन मा.श्री.विकास बं असवले, टाकवे वडेश्वर गटाचे युवा अध्यक्ष मा.श्री.काळुरामशेठ घोजगे,कामगार आघाडी अध्यक्ष .श्री.प्रदिप मोढवे ,जेष्ठ नेते श्री शांताराम असवले ,श्री काशिनाथ जांभुळकर,जेष्ठनेते श्री जालिंदर मोरे,युवानेते मा.श्री.चेतन लोंढे,युवानेते मा.श्री.बाबाजी घोजगे ,युवानेते पै.अविनाश घोजगे,अध्यक्ष अंदरमावळ भाजप वि आघाडी पै.विठ्ठल तुर्डे,अध्यक्ष टाकवेशहर वि आघाडी पै.संतोष राजाराम असवले, युवानेते पै.सिद्धेश लोंढे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर मतदारांनी टाकलेला विश्वास पाहता आगामी निवडणुकीत भाजपाची ही रणधुमाळी अधिक वेगाने वाढले असा विश्वास टाकवे वडेश्वर जिल्हा परिषद गटाचे भाजपाचे अध्यक्ष रोहीदास असवले यांनी व्यक्त केला.
- पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी जिल्हा बँकेमार्फत कर्ज देणार :- माऊली दाभाडे
- महिंद्रा कंपनी परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे आंदर मावळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी
- गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
- बेलज येथे मदुरा मायक्रोफायनान्स लिमिटेड’ आणि ‘क्रेडिटऍक्सेस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाड्यांसाठी आवश्यक साहित्य वितरण
- एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट मिळवा:हाॅटेल शिवराजची खास ऑफर



