श्री.अशोक सिंघल मेमोरियल ट्रस्ट,मुंबई, सेवावर्धिनी, पुणे व ग्रुप ग्रामपंचायत वडेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचा सोहळा
वडेश्वर:
महिला दिनाचे औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत वडेश्वर यांनी विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन केले होते. गावातील सर्व 8अ उतारे इथून पुढे पती पत्नी यांच्या संयुक्त नावे करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
श्री अशोक सिंघल मेमोरियल ट्रस्ट, मुंबई, सेवावर्धिनी पूणे व ग्रुप ग्रामपंचायत वडेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिना निमित्त वडेश्वर येथील भैरवनाथ मंदिराच्या समोर आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली,मान्यवरांच्या हस्ते भारत माता, सावित्रीबाई फुले आणि सरस्वती पूजन झाले, सदर कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन आयुर्वेदाचार्य ज्योती मुंडरगी, अमरजी राऊत व ग्रामपंचायत च्या प्रथम नागरिक सौ छाया हेमाडे यांच्या हस्ते झाले, तर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वडेश्वर येथील विद्यार्थिनींनी सरस्वती वंदन, स्वागत गीत गाऊन सर्व मान्यवरांचे उपस्थितांचे स्वागत केले.
महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये ग्रामीण महिलांच्या आरोग्य व त्याची काळजी या विषयावर आयुर्वेदाचार्य सौ ज्योतीताई मुंडरगी यांनी मार्गदर्शन केले, महिलांनी दैनंदिन जीवनात आपली काळजी कशी घ्यावी, आहार कसा असावा, व्यायाम कोणते आवश्यक आहेत व घरगुती आयुर्वेदिक उपचार कसे करावे या विषयी महिलांना मोलाचा सल्ला दिला.
अमर राऊत सहाय्यक ग्रामोद्योग अधिकारी यांनी खादी ग्रामोद्योग आणि विविध केंद्र व राज्य शासनाच्या योजना व अनुदाने या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच महिलांनी राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करण्यासाठी महिलांना उद्योजिका बनवण्याचे आवाहन केले.
शोभा सुपेकर, संचालिका महर्षी कर्वे संस्था पुणे यांनीही महिलांना उद्योजिका बनवण्याचे आवाहन केले व आवश्यक त्या ठिकाणी प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्यात आश्वासन दिले.
महिलांसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये ग्रामसेवक श्री सचिन कासार यांनी सभे समोरील विषयांचे वाचन केले व सर्व महिलांनी मिळून आज पासून पुढे गावातील सर्व निवासी मिळकती 8अ पती पत्नी यांच्या संयुक्त नावे करण्याचा निर्णय घेतला व ग्रामपंचायतीच्या वतीने काही ८ अ उतारे यांचे वाटप सुद्धा केले.
महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले, यामध्ये फुग्यांची शर्यत, म्युझिकल रिंग, बटाटा शर्यत, उखाणे, महाराष्ट्र वेशभूषा,शाळेतील मुलींसाठी वेशभूषा स्पर्धा,यांचा समावेश होता. सौ अलका निमसे व सौ पल्लवी गवांदे यांनी सर्व खेळाचे नियोजन केले. केंद्रीय प्राथमिक शाळा वडेश्वर येथील शिक्षिका यांनी स्पर्धाचे परीक्षण केले व यौग्य स्पर्धक निवडले.विविध बक्षीस वितरणात पैठणीचे मोठे आकर्षण होते ती पैठणी सौ.धनश्री दरेकर यांनी पटकवली तर स्पर्धे मध्ये सहभागी महिलांना ग्रामपंचयातिच्या वतीने बक्षीस देण्यात आले, तसेच दिवसभर ज्या महिला सहभागी होत्या त्यांनाही आकर्षक भेटवस्तू म्हणून दिवा देण्यात आला.सदर कार्यक्रमात अबालवृद्धाचा सहभाग होता. त्यामुळे ग्रामीण जीवनात महिलांचे महत्व आधीरेखित झाले.
तसेच संपूर्ण दिवसभराच्या या कार्यक्रमात ग्रुप ग्रामपंचायत वडेश्वर अंतर्गत सर्व वड्या वस्त्यावरील महिलांचा उत्फूर्त सहभाग होता, सुमारे २५० पेक्षा जास्त महिलांनी पर्यावरण रक्षणासाठी वसुंधरेची शपथ घेतली, वाडी वस्ती वरून महिलांना एकत्रित करण्यासाठी संस्थेच्यावतीने वाहन व्यवस्था करण्यात आली होती.
संपूर्ण कार्यक्रमाची रचना ग्रामदूत प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक श्री माणिक गवळी व ग्रामसेवक सचिन कासार यांनी केली व कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी ग्रामपंचायत महिला सदस्य सुरेखा शिंदे, हेमांगी खांडभोर,मनीषा दरेकर, कुंदा मोरमारे, रुपाली सुपे यांनी विशेष प्रयत्न केले.तसेच आजी माजी पदाधिकारी, केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोरमारे सर, अंगणवाडी सेविका, रवींद्र हेमाडे, दीपक लष्करी यांनी मेहनत घेतली.

error: Content is protected !!