कामशेत:
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दोस्ती ग्रुप ऑफ बिझनेसच्या वतीने खडकाळा ग्रामपंचायतच्या सदस्या व महावीर हाॅस्पिटल च्या संचालिका अंजना विकेश मुथा यांचा सन्मान करण्यात आला.
कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीत महावीर हाॅस्पिटल सह तालुक्याच्या इतर रूगालयातील कोरोना बाधीत रूग्णांना रेमडेसीव्हीर,प्लाझ्मा,ऑक्सिजन बेड सह इतर वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी मुथा यांनी पुढाकार घेतला होता. या कामाची दखल घेत दोस्ती ग्रुप ऑफ बिझिनेस यांच्या वतीने त्यांना गौरविण्यात आले.
हर्षद दौंडे,संकेत सोनवणे,हर्षद वाघवले,ओंकार कावरे,करण तावरे,अजिंक्य दौंडे,बंटी शिंदे,भावेश गराडे,साहील शिंदे,संदेश शिंदे,अक्षय औताडे,अक्षय जाधव,प्रतिक गावडे,सूरज कडू, श्वेता खंडाते,प्रतिक्षा तराल,विद्या मालपुटे यांच्या सह महावीर हाॅस्पिटल मधील सर्व स्टाफ उपस्थित होता .
ग्रामपंचायत सदस्या अंजना मुथा म्हणाल्या,” स्त्री शक्तीचा आदर करणारा मोठा वर्ग समाजात आहे. स्त्री ही आजी,आई,बहीण,पत्नी,मुलगी या नात्याच्या प्रत्येक जबाबदा-या पार पाडीतच असते. या शिवाय प्रत्येक संकटात खंबीरपणे ठाम उभी असते.

error: Content is protected !!