बजरंग दलाच्या माध्यमातून डोंगरवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर.
टाकवे बुद्रुक:
आंदर मावळ मधील वडेश्वर येथील डोंगरवाडी या आदिवासी पठारावती अजित गौतम तांबे यांच्या समरणार्थ व फिटनेस ३६५ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने, विश्व हिंदु परिषद बजरंग दल आयोजित मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .
दरम्यान आंदर मावळमधील दुर्गम भागात वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत आहेत , लहान मुले, महिला ,वयोवृद्ध नागरिक यांना काही आजार उद्भवल्यास शहरी भागामध्ये उपचार घेण्यासाठी हॉस्पिटल पर्यंत पोहोन्यास अनेक अडचणी येतात, परिणामी आजारांचे निदान त्वरित न झाल्यास त्याचा दुष्परिणाम भोगावा लागल्याचे अनेक चित्र डोळ्यासमोर आहेत. दरम्यान या दुर्गम भागात आरोग्याच्या अनेक समस्या आहेत.
दरम्यान येथील लहान मुलांची तपासणी केली असता लहान मुलांच्या वयाच्या तुलनेत वजन कमी प्रमाणात दिसून येत आहे , तसेच महिलांमध्ये रक्ताचे व कॅल्शियम चे प्रमाण कमी आहे असे तपासणी अंती लक्षात आले .ह्या आरोग्य शिबिरात डॉ रविकिरण अनुसे यांनी कॅल्शिअम व रक्त वाढ या विषयी उद्भवणाऱ्या समस्यांवरती आहारा संदर्भात आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
या दुर्गम भागात आरोग्याचा प्रश्न खूप गंभीर असून या संदर्भातील गांभीर्य लक्षात घेता पुढील काळात बजरंग दल प्रत्येक वाडी वस्तीवर आरोग्य शिबीर घेणार आहे असे बजरंग दल प्रखंड मंत्री सुशील वाडेकर यांनी सांगितले.
या वेळी ज्योती अजित तांबे , अर्जुन बोराटे, फिटनेस क्लब चे योगेश दळवी, डॉ रविकिरण अनुसे, डॉ विश्वजित गारगोटे , सचिन वाघमारे, बजरंग दल विभाग संयोजक संदेश भेगडे, प्रा. बाळासाहेब खांडभोर, महेंद्र असवले, सुशील वाडेकर, भरत शिंदे, सचिन खांडभोर , अंगणवाडी सेविका कविता मोरमारे,भास्कर गोलिया, निखिल भांगरे, रोहिदास ढाकोळ,राजु टिकडे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!