टाकवे बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राची अतिदुर्गम भागात कळकराई येथे आरोग्य सुविधासाठी भेट
टाकवे बुद्रुक:
पश्चिम पट्ट्या मधील मावळ मधील अतिदुर्गम भागातील कळकराई हे गाव पुणे जिल्हा व मावळ तालुक्याचे शेवटचे टोक दरम्यान या ठिकाणी जाण्यासाठी रास्ता नाहीच परिणामी डोंगर दरी मधून ह्या गावी जाण्यासाठी 7 ते 8 किलोमीटर पायी चालत जावे लागत आहे.
शासनाच्या योजनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र टाकवे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलीश साठे, डॉ. नागेश ढवळे यांच्यासह संपूर्ण वैद्यकीय कर्मचारी पथक यांनी या अतिदुर्गम भागाला भेट देऊन संपूर्ण गावात आरोग्य सुविधा दिली.
यामध्ये लहान मुलांची तपासणी, पोलिओ लसीकरण,गरोदर महिलांची तपासनी कोविंड लसीकरण व इतर प्रथमोपचार प्रामुख्याने याचा ह्यामध्ये सहभाग होता. दरम्यान या भागातील नागरिकांनी आरोग्य सुविधांचा लाभ घेता आला .या वेळी आरोग्य निरिक्षक आनंद साबळ व वैद्यकीय पथ यांनी नियोजन केले होते.

error: Content is protected !!