अतिदुर्गम डाहूली शाळेत गिरवले जात आहेत सुलेखनाचे धडे
डाहूली:
पुणे जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या ‘दहा कलमी कार्यक्रमांतर्गत’ सुलेखन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यास मदत होत आहे.मावळातील शाळांमध्ये या उपक्रमामुळे विद्यार्थीवर्ग उत्साहीत आहेत.सुलेखन व पाढे पाठांतर यांसाठी वेळ राखून ठेवला जात असल्याने गुणवत्तावाढीस साहाय्य होत आहे.
मावळ तालुक्यातील अतिदुर्गम डाहूली शाळेतील उपक्रमशील अध्यापक सुशिल कांबळे सरांच्या सुलेखन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची हस्ताक्षरे सुधारु लागली आहेत.अक्षरातील बारकावे,योग्य वळण यामुळे लिहण्याची अचूक पद्धत विद्यार्थ्यांनी अंगिकारली आहे.चित्रावरुन माहिती लिहिणे,छोटे छोटे निबंध,व्यक्तीवर्णन,पर्यावरणपूरक संदेश लिहिणे या बाबींचा सुलेखनात अंतर्भाव केला जात आहे.
डाहूली शाळेतील विद्यार्थ्यांची हस्ताक्षरे पाहून केंद्रप्रमुख श्री.गंगाराम केदार यांनी समाधान व्यक्त केले.विद्यार्थ्यांच्या हीतातच खरा आनंद असतो अशी प्रतिक्रिया उपक्रमशील शिक्षक सुशील कांबळे यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!