पवनानगर : पवनानगर केंद्रावर बारावीची परीक्षा सुरळीत सुरू, विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, लेखनाचे साहित्य देऊन विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा
आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा परीक्षा सुरु झाली.यावर्षी बोर्डाच्या वतीने शाळा तेथे परीक्षा केंद्र या धोरणामुळे
पवनानगर येथील पवना ज्युनिअर कॉलेज येथे मुख्य केंद्र असून या
केंद्रांतर्गत एकविरा ज्युनिअर कॉलेज कार्ला,श्री.छत्रपती शिवाजी विद्या मंदिर कान्हे, कै.सरूबाई पांडुरंग दळवी ज्युनिअर कॉलेज कोथुर्णे व स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज शिवणे या चार उपकेंद्रार असे एकूण ३१९ विद्यार्थी परीक्षार्थी परीक्षा देत आहेत सर्व परीक्षा केंद्रावर सुरळीत सुरु झाली.
यावेळी काले ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व लेखनाचे साहित्य देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी काले ग्रामपंचायतीचे सरपंच खंडुजी कालेकर, उपसरपंच अमित कुंभार,माजी उपसरपंच संदिप भुतडा, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष संजय मोहोळ,सचिन जगताप, केंद्रप्रमुख पांडुरंग डेंगळे,संजय ठाकर,वसंत तिकोणे, सतीश रुपनवर,शाळेच्या प्राचार्या अंजली दौंडे, पर्यवेक्षिका निला केसकर,परिक्षा विभाग प्रमुख वैशाली पाटील,मोहन शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्या अंजली दौंडे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे,परिक्षा केंद्र व शाळा आपलीच असलेल्या परिसरात आपली परीक्षा संपन्न होणार आहे.
यावेळी मावळ तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी पवनानगर व कोथुर्णे या केंद्रांवर भेट देऊन परिक्षे संदर्भातील आढावा घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारत काळे यांनी केले.

error: Content is protected !!