टाकवे बुद्रुक:
येथील बारावीच्या परिक्षा उपकेंद्रात परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
सरपंच भूषण असवले, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी असवले, पोलीस पाटील अतुल असवले, माजी उपसरपंच स्वामी जगताप, ,मुख्याध्यापक बाळासाहेब उभे ,नारायण असवले ,सोपान असवले माणिक जाधव पिराजी,वारींगे उपस्थित होते. विद्यार्थी याना पुष्प गुच्छ देऊन स्वागत करताना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सरपंच भूषण असवले व राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी असवले म्हणाले,” दहावी बारावीची परिक्षा ही विद्यार्थी जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावर आलेल्या मूलांच्या आत्मविश्वास वाढीसाठी स्वागत करताना आनंद वाटला.

error: Content is protected !!