


कामशेत:
कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्टच्या वतीने सांगिसे येथे महाशिवरात्रीनिमित्त किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. दतात्रय महाराज शिंदे यांच्या काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता आली.
कांबेश्वर महादेव ट्रस्टच्या संस्थापिका कांचनबेन कांतीलाल मुथा आणि परिवाराच्या वतीने मागील काही वर्षांपासून येथील सांगिसे तील कांबेश्वर महादेव मंदिरात दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
मागील दोन वर्षाच्या कोरोनाचा कालावधी वगळता दरवर्षी होणा-या धार्मिक कार्यक्रमाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो. या वर्षी विविध धार्मिक कार्यक्रमासह अन्नदान व फराळाचे वाटप करण्यात आले. किसन महाराज केदारी भिमाजी महाराज भानुसघरे यांची प्रवचने झाली.
सुखदेव महाराज ठाकर,संदीप महाथाज लोहर यांची किर्तने झाली. महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा,निलेश मुथा,परेश मुथा यांच्यासह स्थानिक भाविकांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
- पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी जिल्हा बँकेमार्फत कर्ज देणार :- माऊली दाभाडे
- महिंद्रा कंपनी परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे आंदर मावळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी
- गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
- बेलज येथे मदुरा मायक्रोफायनान्स लिमिटेड’ आणि ‘क्रेडिटऍक्सेस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाड्यांसाठी आवश्यक साहित्य वितरण
- एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट मिळवा:हाॅटेल शिवराजची खास ऑफर



