वडगाव मावळ:
माळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पंचायत समिती मावळच्या वतीने घेण्यात आलेल्या मावळ तालुकास्तरीय इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धेत आढले बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेने चमकदार कामगिरी केलेली आहे. इंग्रजी विषयाशी निगडीत विविध नऊ प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या.मावळ तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढले बु शाळेतील 1) WH QUESTION स्पर्धा गट 7वी 8वी मध्ये तन्मय संतोष घोटकुले याने प्रथम क्रमांक मिळवला.मावळचे गटशिक्षणाधिकारी राक्षे, विस्तार अधिकारी वाळुंज , रजनी माळी,केंद्र प्रमुख , मारणे विजय, सरपंच विश्वासराव घोटकुले, उपसरपंच प्रताप घोटकुले शा.व्य. स.अध्यक्ष संतोष कदम, उपाध्यक्ष पांडुरंग घोटकुले यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले. मार्गदर्शन उषा सरकटे , सिताराम वाढवणे, लक्ष्मण कांबळे, वैशाली माळी यांचे लाभले.

error: Content is protected !!