

महाशिवरात्री उत्सवा निमित्त झाली भाऊ बहीण भेट
वडगाव मावळ:
महाशिवरात्री निमित्ताने, मावळ तालुक्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. पोटोबा महाराज देवस्थानचे शिवकालीन श्री. महादेव मंदिरात विश्वस्त अरुण चव्हाण यांचे हस्ते महादेवाचा अभिषेक संपन्न झाला.
तद्नंतर ग्रामदैवत श्री .पोटोबा महाराज यांची पालखी सांगवी या ठिकाणी जाखमाता देवी व श्री पोटोबा महाराज ही भाऊ बहीण भेटीसाठी प्रस्थान झाली. सकाळी दहा वाजता पालखी पोहचल्यावर श्री.पोटोबा महाराज व जोगेश्वरी माता यांना इंद्रायणी स्नान झाल्यावर भजन,आरती व फराळाचे वाटप असा आनंदी बहीण भाऊ भेटीचा सोहळा पार पडला.
मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त उपाध्यक्ष गणेश ढोरे,विश्वस्त सचिव अनंता कुडे,विश्वस्त किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे,तुकाराम ढोरे,सुभाषराव जाधव,आदिंसह काकडा आरती भजनी मंडळाचे विणेकरी बबनराव भिलारे, सुदामराव पगडे, शंकरराव म्हाळसकर ,विठ्ठलराव ढोरे,मधुकर पानसरे, देवराम कुडे, नारायण ढोरे,पंढरीनाथ भिलारे,ज्ञानेश्वर म्हाळसकर, महादू खांदवे, कैलास खांदवे,रवींद्र तुमकर आदि उपस्थित होते.
- कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्ट व महावीर हाॅस्पिटलच्या वतीने
श्री.संत भगवान बाबा ज्ञानेश्वरी प्रासादिक दिंडी साठी मोफत पाणी टँकरची सुविधा - शिंदेघाटेवाडीत वृक्षारोपण तरूणांचा पुढाकार,ज्येष्ठांचे मार्गदर्शन
- टाकवे बुद्रुकला मोफत प्राणायाम शिबीर
- कै कृष्णाजी काजळे प्रतिष्ठानच्या वतीने वारक-यांसाठी मोफत पाणी पुरवठा
- मावळातील १० शाळांना २५ लाख रुपयांचे क्रिडा साहित्य उपलब्ध



